Sangameshwar : माखजन हायस्कुल मध्ये आकाश कंदील बनवण्याचे प्रात्यक्षिक

माखजन : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल माखजन मध्ये आकाश कंदील बनवण्याचे प्रात्यक्षिक झाले. यामध्ये गुरुकुल पूरक उपक्रमातील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. गुरुकुल विभाग प्रमुख संतोष कुलकर्णी, व मानसी कोवळे, हर्षदा कदम, आरजू बेग, अमोल पाटील, यांनी विद्यार्थ्यांना मगदर्शन केले.

यावेळी मुख्याध्यापक महादेव परब, पर्यवेक्षक अंबादास घाडगे, आदी उपस्थित होते. गुरुकुल पूरक उपक्रमात सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांसमवेत प्रशालेतील अन्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विविध आकाराचे आकर्षक आकाश कंदील विद्यार्थ्यांनी बनवले. संस्थेने या उपक्रमाचे कौतुक केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:28 PM 16/Oct/2025