Lanja : वेरवली येथील श्रीराम विद्यालयाचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश

लांजा : तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत वेरवली येथील श्रीराम विद्यालय, तु. पुं. शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय व का. रा. कोळवणकर यामाहा ट्रेनिंग स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. यामध्ये १४ वर्षे वयोगटातील विद्यार्थी सार्थक घडशी- ८० मीटर अडथळा स्पर्धेत प्रथम, श्रेया घडशी- १०० मीटर धावणे प्रथम, असीत जाधव ६०० मीटर धावणे द्वितीय, श्रेया घडशी २०० मीटर धावणे प्रथम, पियुष बाणे ११० मीटर अडथळा तृतीय, नेत्रा जाधव – ४०० मीटर धावणे तृतीय, १४ वर्षे मुले ४० १०० रिले प्रथम, १४ वर्षे मुली द्वितीय, १९ वर्षे वयोगटात स्वरूप शिंदे ४०० मीटर अडथळा प्रथम, पंकज गाडे उंचउडीत द्वितीय, स्वरूप शिंदे ११० मीटर अडथळा द्वितीय, तनिष घडशी उंचउडी तृतीय, मुले ४०० व १०० रिले प्रकारामध्ये प्रथम, तर मुली द्वितीय, १७ वर्षे वयोगटातील विद्यार्थी आर्यन राहुल पडवणकर १०० मीटर धावणे प्रथम, निखिल नागेश कुळये ५ किमी चालणे प्रथम.

साहिल संतोष शिगम ८०० मी. धावणे द्वितीय, शुभम शशिकांत कांबळे ३ किमी धावणे द्वितीय, तेजस सुरेश घडशी ४०० मी. अडथळा शर्यत द्वितीय, सानिका भिकाजी चव्हाण ३००० मी. धावणे द्वितीय, पायल जयराम मांडवकर प्रथम, सलोनी संदीप शिगम ३ किमी चालणे प्रथम, दिव्या प्रकाश आग्रे ८०० मी धावणे द्वितीय, साहिल संतोष शिगम ४०० मी. अडथळा शर्यत प्रथम, आर्या गुरव ११० मी. अडथळा शर्यत द्वितीय, सुजला संदीप शिगम अडथळा शर्यत तृतीय, शुभम पालकर २०० मी. धावणे तृतीय, ४० १०० रिले मुले द्वितीय, रिले मुली द्वितीय, प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या स्पर्धकांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक सचिन कांबळे व नीलेश कुळ्ये यांचे मार्गदर्शन मिळाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:02 PM 16/Oct/2025