Chiplun : जाकीर शेकासन यांनी जाणून घेतल्या पोफळीतील अल्पसंख्याकांच्या समस्या

चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन यांनी चिपळूण तालुक्यातील पोफळी सय्यदवाडी मोहल्याला भेट देऊन अल्पसंख्यांक समाजाच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्या सोबत अल्पसंख्यांक सेल चिपळूण तालुका अध्यक्ष समीर काझी, अल्पसंख्यांक जिल्हा सरचिटणीस जमालुद्दीन बंदरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. ग्रामस्थांच्या वतीने पदाधिकाऱ्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

जिल्हा सरचिटणीस जमालुद्दीन बंदरकर यांनी भेटीचे उद्देश विषद केले. ग्रामस्थांनी आपल्या समस्या पदाधिकारी यांच्या समोर मांडल्या. जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन यांनी यावेळी मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे राबवत अल्पसंख्यांक मुस्लिम समाजासाठी कल्याणकारी योजना असल्याची माहिती दिली. यावेळी तालुका अध्यक्ष समीर काझी यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी सरपंच उस्मान सय्यद, इब्राहिम सय्यद, रफिक सय्यद, महमद सय्यद, अब्बास सय्यद, अब्दुल्ला सय्यद, दिलबर महमद, इब्राहिम उस्मान सय्यद, सिकंदर शमसुद्दीन, फैजुल्ला हासम, मोहसीन इब्राहिम सय्यद उपस्थित होते. दरम्यान, दसपटीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दादा साळवी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी अल्पसंख्यांक सेल जिल्हा सरचिटणीस जमालुद्दीन बंदरकर, चिपळूण तालुका अध्यक्ष समीर काझी, उपाध्यक्ष इमाम शहा, माजी नगरसेविका फैरोजा मोडक, उपाध्यक्ष डॉ. शमिना परकार, रफिक देवळेकर, खालिद पटाईत उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:20 PM 16/Oct/2025