राजापूर : राजापूर तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाची बैठक शुक्रवार दि. १७ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता विठ्ठल मंदिर बाजारपेठ राजापूर येथे वारकरी सांप्रदाय मंडळाचे अध्यक्ष रविंद्र नागरेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत आगामी कार्तीक यात्रा नियोजनाबाबत चर्चा केली जाणार आहे. या बैठकीत एसटी आरक्षण, पंढरपूर येथे नगर प्रदक्षिणा दिंडी आदी बाबत चर्चा केली जाणार आहे. या बैठकीला तालुक्यातील वारकरी सांप्रदाय मंडळ पदाधिकारी सदस्य तसेच वारकरी बंधुंनी उपस्थीत रहावे असे आवाहन वारकरी सांप्रदाय मंडळाचे अध्यक्ष रविंद्र नागरेकर यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:31 PM 16/Oct/2025














