Ratnagiri : पावस रोडवर हातभट्टीची दारू बाळगणाऱ्यावर गुन्हा

रत्नागिरी : तालुक्यातील गणेशगुळे फाटा ते पावस-कुंभारवाडी रस्त्यावर बेकायदेशिरपणे गावठी हातभट्टीची दारू बाळगणाऱ्या विरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वा. करण्यात आली. स्वप्नील महादेव डोंगरे (३९, रा. पावस गोडबोलेवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

त्याच्या विरोधात पोलिस हेड कॉन्स्टेबल वैभव कांबळे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, मंगळवारी सायंकाळी संशयित हा विनापरवाना आपल्या ताब्यात गावठी हातभट्टीची ८५० रुपयांची ८ लिटर दारू विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 AM 17/Oct/2025