‘कोकरे ‘प्रकरणी निःपक्षपाती कारवाई करण्याचे सूचना : मंत्री योगेश कदम

रत्नागिरी : धार्मिक बाबींशी जोडलेल्या भगवान कोकरे यांनी असे करणे योग्य नाही. जे दोषी असतील त्यांच्यावर कडक आणि निःपक्षपाती कारवाई करा, असा सूचना मी पोलिसांना दिल्या आहेत. राहिला माझ्या खात्याच्या अधिकारांचा प्रश्न, तर ती प्रशासकीय बाब आहे. मागे पुढे होऊन जाईल; परंतु ३९ व्या वर्षामध्ये मला मंत्रिपद मिळाले यापेक्षा अजून काय हवे. कॅबिनेट मंत्रिपद मिळावे, अशी सर्वांची इच्छा असते, त्यात गैर काय, असे मत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केले.

शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भगवान कोकरे यांच्याबाबतचा गंभीर प्रकार पुढे आला. धार्मिकतेचे धडे शिकवणाऱ्यांनी असे करणे उचित नाही. याची मी पोलिसांकडून माहिती घेतली. जे दोषी असतील त्यांच्यात निःपक्ष कारवाई करावी, अशा सूचना दिल्या आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपची आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. यावर ते म्हणाले, भाजपच्या बैठकीशी माझा काही संबंध नाही. त्यांच्या पक्षांतर्गत हा विषय आहे. त्यावर मी बोलणे उचित नाही; परंतु महायुती बळकट व्हावी, यासाठी आमचा कायम प्रयत्न आहे. महाविकास आघाडीने मतदार याद्यांवर आक्षेप घेतले आहे. यावर ते म्हणाले, मतदार याद्या चुकीच्या असतील तर दुरुस्तीसाठी एकत्र आले तर त्यात काही चुकीचे नाही. चुका असतील तर त्यामध्ये सुधारणा व्हावी, यात गैर काही नाही.

मला अनेकवेळा विरोधक टार्गेट करतात; परंतु मी माझ्या कामावर लक्ष देऊन आहे. मी रामदास कदमांचा मुलगा आहे. त्यामुळे टिकांना घाबरणार नाही. गृहमंत्री म्हणून मला अधिकार दिले नसतील तरी ती शासकीय प्रक्रिया आहे मागे पुढे होऊन जाईल, मला घाई नाही. एकनाथ शिंदे यांनी मला ३९ व्या वर्षांत पाच खात्यांचचे मंत्रिपद दिले अजून काय हवे. त्यामुळे मला कॅबिनेट मंत्रिपदाची घाई नाही, पण कॅबिनेट मंत्री व्हावे, अशी सर्वांची इच्छा असते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 AM 17/Oct/2025

Cake of the day