खेड : ब्राझीलमधील औरो फिनो क्युयमिका या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्यादरम्यान प्राध्यापक प्रशिक्षण व विद्यार्थी इंटर्नशिप ब्राझीलमध्ये उपलब्ध करुन देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
कंपनीचे अधिकारी लिओनार्डो रोडरीगो दि सिल्व्हा, जॅकलीन कार्नेरो एल्स आणि निखिल दत्तो यांनी प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील व उपप्राचार्य डॉ. सचिन पाटील यांच्याशी अनेक विषयावर चर्चा केली. यातून विद्यार्थ्यांना उपलब्ध होणाऱ्या विविध प्रोजेक्टच्या संधीबाबत विशेष समाधान व्यक्त केले.
जीआयटीच्या शाश्वत सेलतर्फे आयोजिले जाणारे असंख्य उपक्रम व त्यामागील हेतू यावर अधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त करुन त्यांच्याशी संबंधीत त्यांना उपयुक्त माहितीचे संकलन केले. अशा अनेक उपयुक्त विषयांबरोबरच जीआयटीची एक शाखा ब्राझीलमध्ये सुरू करण्याच्या शक्यतेवरही सकारात्मक चर्चा झाली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:06 PM 17/Oct/2025














