मंडणगड : शाळांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तपासणी शिबिराचे आयोजन मंडणगड ग्रामीण रुग्णालय येथे 15 ऑक्टोबर 2025 रोजी करण्यात आले होते. यामध्ये तालूक्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. या शिबिराचे आयोजन जिल्हा विधी प्राधिकरण रत्नागिरी, समग्र शिक्षा शिक्षण विभाग (प्राथ.), जिल्हा परिषद, रत्नागिरी व पंचायत समिती मंडणगड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
यावेळी मंडणगड न्यायालाय्च्या न्यायालयाच्या दिवाणी न्यायाधीश व न्यायादंडाधिकारी श्रीमती अमृता जोशी, मंडणगड वकील संघाचे अध्यक्ष अॅड. मिलिंद लोखंडे, ग्रामीण रुग्णालय मंडणगडचे अधीक्षक डॉ. बालाजी सगरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे, अॅड. घागरूम, डॉ. प्रभाकर भावठाणकर, शिक्षक श्री. बोरले, शिक्षक वैभव भोसले, सुनील ऐनकर आदि मान्यवरांच्या उपस्थितीत शिबिरास सुरवात करण्यात आली. शिबारास 70 दिव्यांग विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या विद्यार्थ्यांची तपासणी करून पैकी 21 विद्यार्थी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी पात्र झाले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:54 PM 17/Oct/2025














