Chiplun : सर्व्हिस रोडच्या बाजूला उभी केलेली दुचाकी चोरीला

सावर्डे : चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील महाविद्यालय समोरील सर्व्हिस रोडच्या बाजूला उभी करुन ठेवलेली दुचाकी चोरीला गेली आहे. हा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीला आला. चोरीला गेलेल्या दुचाकीची किंमत ९६ हजार इतकी आहे.

याबाबत नौमान अन्सार पटेल (वय २३, रा. सावर्डे अडरेकर मोहल्ला, चिपळूण) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सकाळी ९ ते १०:४५ वाजण्याच्या दरम्यान ही चोरी झाली आहे. त्यांनी महाविद्यालयसमोरील सर्व्हिस रोडच्या बाजूला गाडी उभी करुन ठेवली होती. याबाबत सावर्डे पोलिस स्थानकात गुन्हा नोंदवून अधिक तपास पोलिस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:16 PM 17/Oct/2025