Ratnagiri : भाकर संस्थेचा ‘अरूणा’ पुरस्कार मानसी कांबळे यांना प्रदान

रत्नागिरी : आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, महिला सबलीकरण या विषयांवर काम करणाऱ्या भारतीय कष्टकरी रयत सेवा संस्था (भाकर) या संस्थेचा अरुणा पुरस्कार येथील आविष्कार संस्थेच्या सौ. सविता कामत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मानसी राजेश कांबळे यांना प्रदान करण्यात आला. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांनाही ‘भाकर मित्र’ पुरस्काराने गौरविण्यात आले. शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात पुरस्कार वितरण झाले.

देवेंद्र पाटील व कै. अरुणा पाटील यांनी १३ ऑक्टोबर १९९३ मध्ये भाकर सेवा संस्थेची स्थापना केली. या संस्थेचा मानसी कांबळे यांना समाजकल्याण सहायक आयुक्त दीपक घाटे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्रशांत सातपुते, डॉ. रत्ना जोशी, युयुत्सू आर्ते, देवेंद्र पाटील, प्रमोद झिंझाडे उपस्थित होते.

३२ वा वर्धापन दिन १३ ऑक्टोबरला साजरा झाला. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, डॉ. रत्ना जोशी, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, महात्मा फुले समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रमोद झिंझाडे प्रमुख अतिथी होते.

अरुणा पाटील यांच्या कार्याचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी भाकर संस्था सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणान्या महिलेला ‘अरूणा’ पुरस्काराने सन्मानित करते. यंदा मानसी कांबळे यांना हा पुरस्कार मिळाला आहे. तसेच उल्लेखनीय कार्य करणारी जिव्हाळा संस्था (खेडशी), रिहाना जमादार, रामकृष्ण कीर, सचिन शिंदे, पत्रकार जमीर खलपे, कपिलानंद कांबळे, साक्षी गुरव, गौतम गमरे, सिद्धार्थ कांबळे, नीता कदम, पल्लवी परब, धनज्योती महिला प्रभाग संघ, नाचणे, अविनाश जाधव, मयूर भितळे, राम चिंचाळे, ज्योती घडशी, राजू बनसोडे, रामेश्वर म्हेत्रे, प्रशांत बोरकर, श्रीदत्त गिरीसागर, वैभवकुमार शिंदे, आशादीप संस्था रत्नागिरी, अवधूत सुर्वे तसलीम खोपेकर, ताराचंद पुजारी, संतोष पाथरे, आदेश कदम, दर्शना आग्रे, सोनिया सरतापे, पारस पोवार, श्रेयस घाटगे, श्रीधर पाटील, प्रतीक घाटगे, भालचंद्र लाड, चंद्रकांत वाडकर आर्दीना ‘भाकरमित्र’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

Shanti real estate 1

संचालक पवनकुमार मोरे, कमल लोकुरे तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी दीपक घाटे, प्रशांत सातपुते, डॉ. रत्ना जोशी, युयुत्सु आर्ते यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे संस्थापक देवेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले. सचिव अश्विनी मोरे यांनी संस्थेचा प्रवास कथन केला. कार्यक्रमाला भाकर संस्थेच्या मंगल पोवार, खजिनदार प्रतीक्षा सोलीम संचालक पवनकुमार मोरे, कमल लोकुरे तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:43 PM 17/Oct/2025