Dapoli : लोहारवाडी येथे भरदिवसा दागिन्यांची चोरी

दापोली : दापोली तालुक्यातील मौजे दापोली येथील लोहारवाडी येथे राहणाऱ्या अरुणा काताळकर यांच्या बंद दरवाजावर अडकवलेली कुलपाची चावी घेऊन, कुलूप उघडून १६ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी दीडच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

चोरांनी पन्नास हजार रुपयाचे सोन्याचे कानातील टॉप आणि एक लाख रुपये किमतीचे काळे मणी असलेले सोन्याचे मंगळसूत्र लंपास करून पोबारा केला आहे. सदर घटनेची लेखी तक्रार दापोली पोलीस स्थानकात नोंदविण्यात आली असून, या घटनेचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक निर्मळ करित आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:01 PM 17/Oct/2025

Shanti2