मंडणगड : धुत्रोली हनुमानवाडी येथील सरस्वती सुखदरे (७४) या महिलेच्या घरात झालेल्या घरफोडीच्या प्रकरणात मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याच्या २४ तासांच्या आत चोरीचा छडा लावत मंडणगड पोलीस पथकाने कौतुकास्पद अशी कामगीरी केली आहे. अज्ञात चोराच्या विरोधात वृध्द महिलेच्या घरातील ३ लाख ३३ हजार रुपयांचे सोन्याचे चार तोळे इतक्या वजनाचे दागिने व १ हजार रुपये रोख रक्कम हा मुद्देमाल मालकाच्या परवानशिवाय चोरुन नेल्याची तक्रार १५ ऑक्टोंबर २०२५ रोजी दाखल करण्यात आली होती.
या प्रकरणात गुन्हा दाखल होताच पोलिस पथक युध्दपातळीवर कामास लागले. गुन्ह्यांचे तपासाच्या सर्व पध्दतीचा अवलंब केला. या संदर्भात पोलीस दलाच्या श्वान पथकासही घटनास्थळी बोलवणे करण्यात आले होते. पोलिसांनी बोटाचे ठसे व अन्य परिस्थितीजन्य पुरावे गोळा करत संशयित विनोद सुगदरे (४०) राहणार धुत्रोली याच्या संशयीत हलाचालीवल लक्ष ठेवले व (१७) ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारच्या सुमारास त्याचे धुत्रोलीतील घरात चोरीच्या मुद्देमालासह रेड हँड पकडत घरफोडीत चोरीस गेलेला मुद्देमाल व चोर या दोघांनाही गजाआड केले.
पोलिस निरिक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अंमलदार दत्ताराम बाणे, पोलीस नाईक संजय बारगूडे, पो. हेड काँ. संबंधदास मावची, पोलीस हवालदार विशाल कोळथरकर गुप्तवार्ता विभागाचे विनय पाटील, पोलीस पाटील राकेश पोतदार, पोलीस पाटील नूरहसन कडवेकर, पोलिस पाटील रमेश जाधव यांनी यांनी तपास कारवाईत सहभाग घेतला. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी एस. सणस यांनीही पोलीस ठाण्यास भेट देत प्रकरणाची सखोल माहीती घेतली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 AM 18/Oct/2025














