BJP : भाजपाच्या पश्चिम मंडळ युवा मोर्चा तालुका अध्यक्षपदी आशिष मालवणकर यांची निवड

राजापूर : भाजपाच्या राजापूर पश्चिम मंडळ युवा मोर्चा तालुका अध्यक्षपदी भाजपाचे राजापुरातील तरूण कार्यकर्ते आशिष मालवणकर यांची निवड झाली आहे. युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मंदार खंडकर यांनी गुरूवारी मालवणकर यांना भाजपा दक्षिण जिल्हा अध्यक्ष राजेश सावंत यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र दिले. या निवडीबद्दल मालवणकर यांचे अभिनंदन होत आहे.

आशिष मालवणकर हे भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. उच्च शिक्षित असलेले मालवणकर हे एक उत्कृष्ठ क्रिडापटू आहेत. तर तरूणांसाठी क्रिडा स्पर्धांसह अन्य विविध सामाजिक उपक्रम राबविण्यातही त्यांचा पुढाकार असतो. पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात व उपक्रमात त्यांचा कायमच सक्रिय सहभाग असतो. त्यांच्या कामाची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर पश्चिम मंडळ युवा मोर्चा तालुका अध्यक्षपदाची जबाबादारी टाकली आहे.

गुरूवारी राजापूर तालुका भाजपा संपर्क कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी मालवणकर यांना हे नियुक्ती पत्र दिले. याप्रसंगी भाजपाच्या महिला आघाडीच्या प्रदेश सचिव सौ. शिल्पा मराठे, भाजपाचे पश्चिम मंडळ तालुका अध्यक्ष मोहन घुमे, पुर्व मंडळ तालुका अध्यक्ष एड. एकनाथ मोंडे, अभिजित गुरव यांसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या निवडीबद्दल मालवणकर यांचे पक्षातुन अभिनंदन होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:54 PM 18/Oct/2025