Chiplun : दृष्टिहीन बांधवांना पांढरी काठीसह रस्ता ओलांडण्याचे प्रात्यक्षिक

चिपळूण : जागतिक पांढरी काठी दिनानिमित्त जिल्हा शाखा रत्नागिरीच्या वतीने चिपळूण शहरात इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राजवळ विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोरील रस्त्यावर दृष्टिहीन बांधवांनी पांढरी काठीसह रस्ता ओलांडण्याचे प्रात्यक्षिक सादर करून सामाजिक जनजागृतीचा प्रभावी संदेश दिला.

या कार्यक्रमात दहा दृष्टिहीन दिव्यांगांचा सहभाग होता. पांढरी काठी दिन हीच माझी वाणी, आम्ही नाही दुर्बळ आमची वेगळी कहाणी, अशा जोशपूर्ण घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. याप्रसंगी नॅब संस्थेचे अध्यक्ष नीलेश भुरण, उपाध्यक्ष इब्राहिम दलवाई, कार्यवाह भरत नांदगावकर, संचालक अॅड. विवेक रेळेकर, प्रकल्प अधिकारी संदीप नलावडे, शिक्षणविस्तार अधिकारी सौरवी जाधव तसेच पोलिस कर्मचारी रसाळ, मयूर चव्हाण, वैभव फके, सूरज वरवाटकर आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:36 PM 18/Oct/2025

Infigo Eyecare