Khed : घरडा कॉलेजमध्ये आयटीआय विद्यार्थ्यांना टर्नरचे प्रशिक्षण

खेड : लवेल घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळवून देण्यास कार्यरत असते. याचाच एक भाग म्हणून कान्हे पिंपळी चिपळूण येथील आयटीआयच्या १८ विद्यार्थ्यांसाठी ४८ तासांचा प्रत्यक्ष प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये संसाधन व्यक्ती, प्रशिक्षक : डॉ. समीर एस. गजमल व पी. व्ही. वाटेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना विविध मशीनच्या ऑपरेशन्स कशा चालतात, हे शिकवण्यात आले.

या प्रशिक्षणात सहभागी विद्यार्थ्यांनी टर्निंग जॉब मूल्यांकन पूर्ण केले आणि प्रमाणपत्रे प्राप्त केली. या प्रक्षिक्षणासाठी लागणारे सर्व साहित्य घरडा महाविद्यालयामार्फत मोफत उपलब्ध करण्यात आले होते. हा कार्यक्रम प्राचार्य डॉ. प्रमोद बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:05 PM 22/Oct/2025

Shanti2