Ratnagiri: काँग्रेसची आज आढावा बैठक

चिपळूण : उत्तर रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आढावा बैठक व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम सोमवारी (ता. २७) आयोजित करण्यात आला आहे. शहरातील धवल प्लाझा येथे मुलाखतीचा कार्यक्रम होईल, अशी माहिती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लियाकत शहा यांनी दिली.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांच्या बैठका झाल्या. या पक्षांनी निवडणुकीच्यादृष्टीने तयारी करण्यास सुरुवात केली आहे तर आता काँग्रेसनेदेखील बैठकीचे आयोजन केले आहे. इच्छुकांच्या मुलाखतीसाठी जिल्ह्याचे निरीक्षक आबा दळवी, श्रद्धा ठाकूर, शशांक बावस्कर उपस्थित राहणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 27-10-2025

Shree clinic