Chiplun : चिपळूण डॉ. आंबेडकर वाचनालयात नोंदणीपेक्षा मिळणार जादा पुस्तक

चिपळूण : शहरातील डॉ. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम पार पडला. यानिमित्त वाचनालयात आलेल्या वाचकांचा पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. तसेच वाचनालयांमध्ये सभासद असलेल्या प्रत्येक वाचकाला त्याच्या नोंदणीपेक्षा एक जादा पुस्तक या महिन्याभरात दिले जाणार आहे.

मराठी भाषेचा वाचन प्रचार आणि प्रसार होण्याच्या उद्देशाने तसेच वाचनालयाचे महत्त्व आणि वाचनाचे महत्त्व लक्षात घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वाचनालयाचे कार्याध्यक्ष सुनील खेडेकर, कार्यवाह सुमेध करमरकर, कोषाध्यक्ष अमित ओक, संचालक प्रदीप पवार व ग्रंथपाल तेजश्री सोमण व कर्मचारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 AM 27/Oct/2025

Sahyog multi.