चिपळूण : उत्तर प्रदेशमध्ये ऑनलाईन फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी चिपळुणातून आमीर खान सरगुरोह (रा. गोवळकोट रोड) याला उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक करून नेले आहे. यामुळे चिपळुणात खळबळ उडाली आहे. आमीर खान सरगुरोह याच्यावर उत्तर प्रदेशमध्ये ऑनलाईन फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
गेले अनेक तेथील पोलिस त्याच्या मागावर होते. अखेर महाराष्ट्र पोलिस आणि चिपळुणातील स्थानिक पोलिसांनी सहकार्य केल्यानंतर त्याला २७ ऑक्टोबर रोजी दुपारी चिपळूणमध्ये ताब्यात घेण्यात आले व यानंतर उत्तर प्रदेशकडे नेण्यात आले आहे. याकामी उत्तर प्रदेश पोलिसांना चिपळूण पोलिसांनी सहकार्य केले आहे. अधिक तपास उत्तर प्रदेश पोलिस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:33 PM 29/Oct/2025














