Ratnagiri : जिल्ह्यात ९ नोव्हेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश

रत्नागिरी : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी ९ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात प्रतिबंधात्मक मनाई आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिला आहे. जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष, विविध संघटना वेगवेगळ्या घटकांतील नागरिकांकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात.

राष्ट्रीय महामार्ग मुंबई-गोवा क्र. ६६ चे काम पूर्ण न झाल्याच्या निषेधार्थ आंदोलन केली जातात. अशा वेळी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते. सध्या ओबीसी व मराठा आरक्षणावर दोन समाजांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यावरून आंदोलन होण्याची शक्यता आहे. दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर शुल्लक कारणांवरून वाद होऊन कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच आगामी नगर परिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत निवडणुका होणार असून, त्या अनुषंगाने गावपातळीवर पक्षवाढीसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यावरून गटागटात वादविवाद निर्माण होऊ शकतो. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने मनाई आदेश जारी करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:48 PM 30/Oct/2025

Samarth gold