यंदा कर्तव्य! तुळशी विवाहानंतर नोव्हेंबर, फेब्रुवारी, मे मध्ये सर्वाधिक मुहूर्त

रत्नागिरी : दिवाळीसण मोठ्या उत्साहात संपल्यानंतर लवकरच तुळशीचे लग्न आहे. तुळशीच्या लग्नानंतर खऱ्याअथनि लग्नाचा हंगाम सुरू होतो. यंदा कर्तव्य आहे, उडवून द्या लग्नाचा बार असे म्हणत घराघरात लगीनघाईचा गजर सुरू झाला आहे. दसरा, दिवाळीत काहींनी मोठ्या प्रमाणात लग्नापूर्वीच खरेदी केली आहे. यंदा विवाहासाठी ४९ दिवस शुभमुहूर्त, तर मुंजीसाठी अवघे २० दिवस असणार आहेत.

सर्वाधिक मुहूर्त फेब्रुवारी महिन्यात १०, मे महिन्यात ८, तर सर्वात कमी डिसेंबर महिन्यात केवळ दोन लग्नाचे मुहूर्त आहेत. पंचागानुसार देवउठणी एकादशी म्हणजेच तुळशीविवाह २ नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. याचदिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेतून जागृत होत असून शुभकार्याचा आरंभ करण्यास परवानगी मिळते. त्यामुळे तुळशी लग्नानंतर विविध मंगल कार्यास सुरूवात होणार आहे.

यावर्षीचे ग्रहसंयोग विवाहयोगासाठी फारसे अनुकूल नाहीत. ८ जूननंतर गुरू अस्त आणि ५ डिसेंबर २०२५ ते ६ फेब्रुवारी २०२६ दरम्यान शुक्राचा अस्त राहणार असल्याने या काळात कोणतेही विवाह मुहूर्त उपलब्ध नाहीत.

हॉल बुकिंगसाठी होणार धावपळ
नोव्हेंबरपासून लग्नाचा हंगाम सुरू होणार आहे. नोव्हेंबर महिन्यात ६, तर डिसेंबर महिन्यात दोन मुहूर्त असल्यामुळे ज्यांना नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये लम्नकार्य करायचे आहे त्यांना लग्नासाठी हॉल बुकिंगसाठी धावपळ करावी लागणार आहे.

Shiva optical

काहीजणांकडून आधीच खरेदी
सोने-चांदीसह विविध वस्तूंच्या किंमती वाढत असल्यामुळे घरात विवाह कार्यापूर्वीच लग्नाची तयारी करण्यासाठी नागरिकांकडून दिवाळी, दसरा, पाडव्यात खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे लग्नकार्य जुळले तरी ऐनवेळेत धावपळ होणार नाही.

असे आहेत विवाहाचे शुभमुहूर्त
नोव्हेंबर २०२५ दिनांक. २२, २३, २५, २६, २७, ३० डिसेंबर दिनांक. २, ५ फेब्रुवारी २०२६ दिनांक. ६, ७,१०, ११,१२, २०, २१, २२, २५, २६ मार्च २०२६ दिनांक. ५, ७, ८, १४, १५, १६ एप्रिल २०२६ दिनांक .२१, २६, २८, २९, ३० मे२०२६ दिनांक. १, ३, ६, ८, ९, १०, १३, १४ जून २०२६ दिनांक १९, २३, २४, २७

मुंजीचे शुभमुहूर्त
फेब्रुवारी २०२६ दिनांक, ६, १९, २२, २६, २७
मार्च दिनांक. ८,२०, २९
एप्रिल दिनांक. ३, ८, २१, २२, २८
मे दिनांक. ३, ६, ७, ८
जून दिनांक. १६, १७, १९

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:50 PM 31/Oct/2025