Ratnagiri : हौशी राज्य नाट्य स्पर्धेत १८ नाटकांची मेजवानी

रत्नागिरी : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या ६४व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धांची प्राथमिक फेरी येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात १० नोव्हेंबर ते ९ डिसेंबर या कालावधीत दररोज सायंकाळी सात वाजता रंगणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशीष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा होणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक विभिषण चवरे यांनी सांगितले.

स्पर्धेमध्ये एकूण १८ संघांचा सहभाग असून, रत्नागिरी जिल्ह्यातील संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. १० नोव्हेंबरला नाटक अकल्पित, ११ ला पूर्वज, १२ ला इंडियाज मोस्ट वॉन्टेड, १३ ला मंगलाक्षता, १४ ला इम्युनिटी, १७ ला येऊन येऊन येणार कोण, १९ ला ऑक्सिजन, २० ला तीनसान, २१ ला अग्निपंख, २४ ला सुखांशी भांडतो आम्ही, १ डिसेंबर कांचनमृग, २ ला अनपेक्षित, ३ ला एक्स्पायरी डेट, ४ ला तृतीयपंथी पुरुष, ५ ला जन्मवारी, ६ लातू पालनहारी, ७ ला नमान, ९ ला ईठ्ठला ही नाटके होणार आहेत. राज्य नाट्य स्पर्धेतील सर्व नाटकांना जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे आणि हौशी रंगकर्मीचा उत्साह वाढवावा, असे आवाहन संचालक विभिषण चवरे यांनी केले आहे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:13 PM 31/Oct/2025