Ratnagiri : जिल्हा विधि सेवा प्राधिकरणतर्फे बळी पडलेल्या व्यक्तींकरिता नुकसानभरपाई योजना

रत्नागिरी : जिल्हा विधि सेवा प्राधिकरणच्या वतीने ग्रामपंचायत फुणगुस (ता. संगमेश्वर) येथे ‘बळी पडलेल्या व्यक्तींकरिता नुकसानभरपाई योजना २०१४’ व विधि सेवा प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पॅनल विधिज्ञ अमित अनंत शिरगावकर यांनी जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या वतीने पुरविण्यात येणाऱ्या सेवांविषयी माहिती दिली. सचिव आर. आर. पाटील यांनी बळी पडलेल्या व्यक्तींकरिता नुकसानभरपाई सेवा योजना २०१४ व विधि प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमावेळी जिल्हा विधि सेवा प्राधिकरण रत्नागिरीचे सचिव आर. आर. पाटील तसेच सरपंच अशोक विठ्ठल पांचाळ, किरण गजानन भोसले, पोलिस पाटील प्रशांत सखाराम धुळ, ग्रा.पं. अधिकारी पोचरी होता अशोक सदाशिव भुते, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्य, परिचारिका तसेच फुणगुस गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:27 PM 31/Oct/2025

Shanti2