खेड : पंढरपूर यात्रेसाठी सोडण्यात आलेल्या जादा बसेसमुळे आगारातून सुटणाऱ्या नियमित ४० बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. ऐन दिवाळीच्या हंगामात खेड बसस्थानकातून सुटणाऱ्या बसफेऱ्यांचे वेळापत्रक पुरते कोलमडले आहे. ग्रामीण भागात सुटणाऱ्या नियमित बसफेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
२२ येथील बसस्थानकातून ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरपर्यंत ग्रामीण भागात मार्गस्थ होणाऱ्या तब्बल ४० बसेस रद्द केल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. रद्द बसफेऱ्यांच्या बदल्यात अन्य बसफेऱ्यांची व्यवस्था न केल्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. पंढरपूरसाठी ३४ बसेस आरक्षित करण्यात आल्या आहेत. या बसेस २८ ऑक्टोबरपासून बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत
पंढरपूरच्या दिशेने रवाना होत आहेत. यामुळे आगारात बसेसची मोठ्या कमतरता प्रमाणात भासत आहे. दिवाळीचा हंगाम संपला असला तरी अद्याप शाळा, महाविद्यालयांना सुट्टी आहे. त्यामुळे तालुक्यात पर्यटनासाठी आलेल्या प्रवाशांना इच्छित स्थळ गाठताना कसरत करावी लागत आहे. बसफेऱ्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याने बस नेमकी कधी सुटणार याबाबत निश्चित माहिती उपलब्ध होत नाही. त्यामुळे प्रवाशांना स्थानकातच तासनतास तिष्ठत बसावे लागत आहे. दरम्यान, ही परिस्थिती ४ नोव्हेंबरपर्यंत कायम राहणार असल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:47 PM 31/Oct/2025














