देवरुख : संगमेश्वर बसस्थानक परिसरात बुधवारी बेशुद्ध अवस्थेत मिळालेल्या वृद्धाला रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. युसूफ महम्मद नेवरेकर (८२, रा. कळबंस्ते मोहल्ला, ता. संगमेश्वर) असे मृत्यू पावलेल्या वद्धाचे नाव आहे.
या घटनेची खबर त्यांचे पुतणे आणि शेजारी राहणारे ताहीर कादीर नेवरेकर यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात दिली आहे. २९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वा. च्या सुमारास युसूफ नेवरेकर हे संगमेश्वर बसस्थानकाच्या बाजूस असलेल्या वडापावच्या गाडीजवळच्या लादीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळले. ही माहिती मिळताच ताहीर नेवरेकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
ताहीर नेवरेकर यांनी गावातील लोकांच्या मदतीने युसूफ नेवरेकर यांना उपचारासाठी संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. संगमेश्वर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. संगमेश्वर पोलिस अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:08 PM 31/Oct/2025














