खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे फागेवाडीनजीक शुक्रवारी सायंकाळी चालकाचे नियंत्रण सुटून कार रस्त्याच्या बाजूला उलटली. या अपघातात ८५ वर्षीय वृद्ध आणि चालक गंभीर जखमी झाले आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात असलेली कार (एमएच ०७एबी ५३५४) भरधाव वेगात जात असताना खेड तालुक्यातील भरणे फागेवाडी येथे आली असता चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने मोटार रस्त्याच्या बाजूला खोल खड्ड्यात कोसळली. कारमधून प्रवास करणारी जुबेदा शहा (८५, कल्याण) आणि चालक अरबाज (२७) हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर तत्काळ स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना भरणे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 AM 01/Nov/2025














