रत्नागिरी : तालुक्यातील वेतोशी गावचे सुपुत्र व शहरातील गोदुताई जांभेकर विद्यालयाचे शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी विठ्ठल बोटके (५१, रा. वेतोशी, रत्नागिरी) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
ही घटना शुक्रवारी सकाळी ११ वा. सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. त्यांच्या आकस्मिक निधनाने वेताशी गावात शोककळा पसरली आहे. सकाळी ८.३० वा. सुमारास पाठीत दुखून त्यांना चक्कर आली. तातडीने त्यांना उपचारासाठी रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच गावातील सरपंच अरुण झोरे यांच्यासह ग्रामस्थांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 01-11-2025














