रत्नागिरी : तालुक्यातील चाफेरी येथे कामाच्या ठिकाणी हजर असलेल्या कोल्हापूर येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना गुरुवार, दि. ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वा. सुमारास घडली. युवराज रामनाथ खोत (५०, रा. खोतवाडी हातकणंगले, कोल्हापूर) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे.
युवराज खोत यांना बुधवार २९ ऑक्टोबर रोजी फिट आल्याने त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद खंडाळा येथे औषधोपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना बरे वाटल्याने दुसऱ्या दिवशी गुरुवार, दि. ३० ऑक्टोबर रोजी ते चाफेरी येथील कामाच्या ठिकाणी हजर होते. ते त्याच ठिकाणी रहात असलेल्या शेडच्या बाहेर बसलेले असताना त्यांच्या नाकातून रक्त आल्याने व ते कोणतीही हालचाल करत नसल्याने खबर देणार सुजित पाटीलने इतर कामगारांच्या मदीतीने युवराज खोत यांना प्राथमक आरोग्य केंद्र वाटद खंडाळा येथे दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 AM 01/Nov/2025














