रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात इंदिरा गांधी, सरदार पटेल यांना अभिवादन

रत्नागिरी : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आणि राष्ट्रीय संकल्प दिवस आणि माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती तसेच राष्ट्रीय एकता दिवसा निमित्त जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

“मी राष्ट्राचे एकता, अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी स्वत:ला समर्पित करीन, सरदार वल्लभभाई पटेल यांची दूरदृष्टी व कार्यामुळे देशाची एकता राखणे शक्य झाले. तसेच मी माझ्या देशाची अंतर्गत सुरक्षा अबाधित ठेवण्याकरिता माझे स्वत:चे योगदान देण्याचा सत्यनिष्ठापूर्वक संकल्प करीत आहे”, अशी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आज येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली. यावेळी प्र. निवासी उपजिल्हाधिकारी राहुल गायकवाड यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 01-11-2025