10th& 12th Borad Exam : बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीला तर दहावीची २० फेब्रुवारीला

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीला, तर दहावीची परीक्षा २० फेब्रुवारीला सुरू होणार आहे. राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येते. राज्य मंडळाने तारखेनुसार सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या www. mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 AM 01/Nov/2025