Dapoli : दापोलीतील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी

दापोली : तालुक्यातील अनेक भागांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे भातपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आंजर्ले येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश महाडिक यांनी दापोली तहसीलदारांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.

नुकत्याच झालेल्या पावसामुळे कापणीला आलेले भात ओलाव्यामुळे शेतातच कुजत असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित पंचनामे करून पीकविमा व शासकीय अनुदानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी त्यांच्यासोबत दिलीप बांद्रे, प्रकाश शिर्के आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 AM 01/Nov/2025

Naadi pariksha