रत्नागिरी : सर्व माध्यमांच्या शाळांसाठी मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी शासनाने मान्यता दिली असून, आजपासून ते ३१ नोव्हेंबरपर्यंत हे अभियान जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे.
२०२५-२६ मध्ये अभियान काही नवीन उपक्रमांसह राबवण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार हा निर्णय घेतला आहे. या अभियानामध्ये विविध स्तर व वर्गवारीमध्ये विजेत्या शाळांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. या अभियानासाठी शाळांची विभागणी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन वर्गवारीमध्ये केली आहे. तालुका, जिल्हा, महानगरपालिका स्तरावर या अभियानातील पुरस्कारही विभागले आहेत. प्रत्येक स्तरावरील विजेता या दोन्ही वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे निवडला जाणार आहे. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा या घटकांबाबत जागृती करून विद्यार्थ्यांच्य व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्त्वाकांक्षी उद्दिष्टातून ही योजना राबवली जाणार आहे.
१ जानेवारी ते ७ फेब्रुवारीला मूल्यांकन प्रक्रिया
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्र, वर्ग अ व ब च्या नगरपालिकांचे कार्यक्षेत्र तसेच उर्वरित महाराष्ट्र स्तरावर राबवले जाणार आहे. ३१ डिसेंबरला या अभियानाचा कालावधी पूर्ण होणार आहे. १ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मूल्यांकनांची प्रक्रिया होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 AM 01/Nov/2025














