Dapoli : बदनामी करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा;वंचित बहुजन आघाडीचे पोलिसांना निवेदन

दापोली : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसिद्ध केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी तालुका शाखा दापोली यांच्या वतीने एका निवेदनाद्वारे पोलिसांकडे करण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्याविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह विधान करणारी पोस्ट फिरत आहे. समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे कृत्य संबंधितांनी केले आहे. दापोली पोलिसांनी स्वतः दखल घेऊन या प्रकरणाबाबत तक्रार नोंदवावी, अशी विनंती करण्यात आली आहे. या पत्रावर पवन धोत्रे, मधुकर मर्चेंडे, अनंत जाधव, अनंत शेळके, तानाजी जाधव, प्रथमेश जाधव, विशाल आयरे, मुकुंद कासारे यांची नावे आहेत. हे निवेदन दापोली पोलिस ठाण्याच्या साहाय्यक पोलिस निरीक्षक पूजा हिरेमठ यांनी स्वीकारले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:16 PM 01/Nov/2025

Radhakrushna patapedhi