Chiplun : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त चिपळुणात एकता दौड

चिपळूण : भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पोलिसांच्यावतीने रन फॉर युनिटी या नावाने एकता दौड आयोजित करण्यात आली होती. या दौडमध्ये पोलिस, शासकीय कर्मचारी आणि शहरातील नागरिक सहभागी झाले. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले यांच्या उपस्थितीत या एकता दौडला सुरुवात झाली. यानिमित्त चिपळूण पोलिस ठाण्यात सकाळी सात ते साडेआठ या कालावधीत पाच किलोमीटर एकता दौड काढण्यात आली.

यामध्ये चिपळूण पोलिस ठाण्याचे चार पोलिस अधिकारी, ३० अंमलदार, ३० आरसीपीचे जवान, १२ होमगार्ड, १२ पोलिसपाटील, चिपळूण पालिकेचे ३० कर्मचारी, डीबीजी कॉलेजचे ३० विद्यार्थी, गुरुकुल कॉलेजचे २० विद्यार्थी व महिला सायकलिंग असोसिएशनचे १२ महिला एकता दौडमध्ये सहभागी झाल्या होत्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 PM 01/Nov/2025