Constitution Amrut Mahotsav : रत्नागिरीत ३, ४ नोव्हेंबरला ‘गौरव गाथा संविधानाची’

रत्नागिरी : भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० ते रात्री १० वा. ‘गौरवगाथा संविधानाची’ व ४ ला सायं. ६.३० ते रात्री १० वा. ‘जागर संविधानाचा’ या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशीष शेलार, उद्योगमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम, खासदार सुनील तटकरे, खासदार नारायण राणे आदी उपस्थित राहणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:29 PM 01/Nov/2025

Sahyog multi.