Shivai-E- ST BUS : दापोली-दाभोळ मार्गावर शिवाई ई-बस पडली बंद

दापोली : दाभोळ येथून दापोलीकडे येणारी शिवाई ई-बस शुक्रवारी (ता. ३१) सायंकाळी प्रवासादरम्यान अचानक बंद पडल्याची घटना घडली. दाभोळ येथून संध्याकाळी ४ वा. सुटलेली ही बस दापोली-जालगाव (सुतारकोंड) परिसरात अचानक बंद पडली. या बसमध्ये सुमारे २० प्रवासी होते. घटनेनंतर सर्व प्रवाशांना पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या दाभोळ बसमध्ये सुरक्षितरीत्या बसवून दापोली आगाराकडे पाठविण्यात आले.

ही बस बंद पडल्याने प्रवाशांमध्ये काही काळ चिंता निर्माण झाली. या बसमध्ये असलेल्या सेन्सरवर मॉइश्चर पकडल्याने डॅशबोर्डसमोरील स्क्रीनवर मेसेज आला तेव्हा चालकाने बस बाजूला थांबवली आणि विनायक आगरकर (तंत्रज्ञ) यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी बसची पाहणी केली असता कोणताही बिघाड झाला नसून, गाडी पुन्हा चालू करून आगारात आणण्यात आली आणि चार्जिंग स्टेशनला आणून चार्जिंगला लावण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:33 PM 01/Nov/2025