Ratnagiri: दक्षता जनजागृती सप्ताह निमित्तानं विविध कार्यक्रम

रत्नागिरी, दि. 1 : दक्षता जनजागृती सप्ताहच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.

या अंतर्गत शासकीय नर्सिंग कॉलेज, जिल्हा शासकीय रुग्णालय, येथे दक्षता जनजागृती सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी भ्रष्टाचार निर्मुलनाबाबत सविस्तर माहिती देवून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच उपस्थितांना माहितीपत्रकाचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथील उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, नगरपंचायत कार्यालय, सह दुय्यम निबंधक कर्यालय, तहसिलदार कार्यालय व पंचायत समिती कार्यालय या कार्यालयात तसेच बसस्थानके, रिक्षा स्टँड येथील नागरिकांना भ्रष्टाचार निर्मुलनाबाबत माहिती देवून उपस्थितांना माहितीपत्रके वाटवण्यात आले. मोक्याच्या ठिकाणी माहितीपत्रके लावून जनजागृती करण्यात आली.

रत्नागिरी शहर परिसरातील पोस्ट ऑफीस कार्यालयात भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत बैठक आयोजित करुन उपस्थित अधिकारी कर्मचारी वर्ग यांना भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत सविस्तर माहिती देवून त्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

स्थानिक वृत्तपत्र, केबल टिव्ही व आकाशवाणीव्दारे भ्रष्टाचार विरुध्द जनजागृती पर संदेश प्रसारीत करण्यात आले. तसेच सोशल मीडीयाव्दारे व्हॉटसअप ग्रुपवर भ्रष्टाचार विरुध्द जनजागृती पर संदेश प्रसारीत करुन तक्रारीकरिता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांचेकडील फोन नं. ०२३५२-२२२८९३ आणि टोल फ्री क्रमांक १०६४ या क्रमांकाबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्यावतीने खासगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास अविनाश पाटील, पोलीस उप अधीक्षक, लाप्रवि, (मो. क्र. ७५८८९४१२४७), मच्छिंद्र जाधव, पोलीस निरीक्षक, लाप्रवि,, (मो. क्र. ९८७०४७४५३५), सुहास रोकडे, पोलीस निरीक्षक, लाप्रवि, (मो. क्र. ९०६७०३५९१०) यांना संपर्क साधावा अथवा acbmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर acbmaharashtra.net येथे किंवा ई-मेल आयडी acbratnagiri@gmail.com, dyspacbratnagiri@mahapolice.gov.in, फोन नं. ०२३५२-२२२८९३ आणि टोल फ्री क्रमांक १०६४ वर तक्रार नोंदवावी.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:10 01-11-2025