गुहागर : आगामी होऊ घातलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गटाच्या गुहागर तालुक्यातील तळवली पंचायत समिती गण आणि असगोली जिल्हा परिषद गट या दोन्ही जागा लढवण्याचा निर्धार रिपब्लिकन सेनेने घेतला आहे. या संदर्भात चर्चा व नियोजनासाठी जिल्हा कार्यकारिणी गुहागरमध्ये दाखल झाली आहे.
रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली कोकणचे नेते संदेश मोहिते आणि जिल्हाध्यक्ष महेश सकपाळ यांच्या मार्गदर्शनाने गुहागर तालुक्यामध्ये रिपब्लिकन सेनेची घोडदौड सुरू आहे. आता तळवली व असगोलीची जागा जिंकण्याचा निर्धार पक्षाने केला आहे.
राज्यामध्ये रिपब्लिकन सेना आणि शिवसेना शिंदे गट यांची युती झाली आहे. याचा फायदा पक्षाला तालुकास्तरावर होणार असल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. तालुक्यात ओबीसी नेतृत्वालाही संधी देण्याचा पक्षाचा मानस आहे. तालुक्यातील असगोली आणि तळवली या दोन्ही जागा लढणार आणि जिंकणार असा आशावाद पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र मोहिते यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:31 PM 01/Nov/2025












