देवरुख : देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात ४ नवीन मॉडेल्स आणण्यात आली आहेत. यात सूर्य, पृथ्वी आणि चंद्र प्रतिकृती असून या मॉडेलमधून पृथ्वीचे परिवलन व परिभ्रमण, ऋतू, दिवस-रात्र, ग्रहणे, अमावास्या आणि पौर्णिमा, चंद्राची कक्षा, अधिक महिना, राशी संक्रमण, चंद्र महिना अशा मूलभूत संकल्पना विषद होणार आहेत.
तिथी आणि नक्षत्रे या विषयीची प्रतिकृती असणारे तिथी मॉडेल आहे. हे चंद्र सूर्य व पृथ्वी यांच्या गतीवर आधारित भारतीय पंचांगातील काही संकल्पना स्पष्ट करते जसे शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष, सूर्याचे नक्षत्र स्थान, सायन व निरयन पृथ्वीची परांचन गती समजून घेण्यासाठी अभिमुखता मॉडेल मदत करते. राहू व केतू या संकल्पनेचे खगोलीय स्पष्टीकरण राहू केतू प्रतिकृती करते. राहू व केतू ज्या कक्षेत फिरतात ती पण बदलत असते. एक फेरी पूर्ण व्हायला १८.६ वर्षे कशी लागतात हे कळते.
ही सर्व मॉडेल्स सुप्रसिद्ध अवकाश अभ्यासक रवींद्र गोडबोले यांनी ३ प्रिंटिंग तंत्रज्ञानाने बनवलेली आहेत. सृजन विज्ञान केंद्र विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाचा प्रसार व्हावा यासाठी कटीबद्ध आहे. या मॉडेल्सच्या माध्यमातून विज्ञान केंद्रामध्ये अवकाशविषयीची वर्कशॉप्स सुरू करण्यात येणार आहेत. त्याचा लाभ कोकणातील विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन सेंटरचे सर्वेसर्वा सदानंद भागवत यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:42 PM 01/Nov/2025












