चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे येथे डेरवण फाटानजीक शुक्रवारी (ता. ३१ ऑक्टोबर) दुपारी अपघात घडला. या अपघातात तिघेजण जखमी झाले. याची नोंद सावर्डे पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या अपघातप्रकरणी मोटारचालक संदेश यशवंत उपरे (रा. पालवण, कोष्टेवाडी, चिपळूण) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या अपघाताविषयीची फिर्यादी जयदीप संजय कुलकर्णी (वय २२, रा. श्री लक्ष्मीकृपा, भोसरी पुणे) यांनी दिली आहे.
या फिर्यादीनुसार, जयदीप कुलकर्णी हे मोटारीने गणपतीपुळे ते पुणे असा प्रवास करत होते. डेरवण फाटा येथे संदेश यशवंत उपरे याने त्याच्या ताब्यातील मोटार उजव्या बाजूकडे चालवत घेऊन येत होता. उपरे याने कुलकर्णी यांच्या मोटारीला धडक दिली. यामध्ये पल्लवी जयप्रकाश राव (वय २२), निकिता जयप्रकाश राव (२०, दोन्ही रा. कोथरूड पुणे), दिव्या राजन (२१ वर्षे, रा. पिंपरी चिंचवड) हे जखमी झाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 AM 03/Nov/2025












