चिपळूण : आमदार शेखर निकम यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने तत्पर प्रतिसाद देत सावर्डेतील शेतकरी व ग्रामस्थांच्या शेतजमिनीची पाहणी केली. या पाहणीदरम्यान शेतकरी सूर्यकांत चव्हाण, शौकत माखजनकर, मैनुद्दीन खलपे व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
या पाहणीत चिपळूण तालुका कृषी अधिकारी शत्रुघ्न म्हेत्रे, मंडळ कृषी अधिकारी कोमल घोडके, उप कृषी अधिकारी विकास पिसाळ आणि अशोक जाधव यांचा सहभाग होता. शेतकऱ्यांच्या अडचणी, पिकांची सद्यस्थिती तसेच झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. आमदार शेखर निकम यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने पीक पाहणी केल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 AM 03/Nov/2025












