संगमेश्वर : तालुक्यातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. जीवापाड जपलेली भातशेती पावसाने वाहून गेली आहे. केवळ भात शेतीवर अवलंबून असणाऱ्यांना सर्वस्व वाहून गेल्याचे दुःख आहे. अशीच व्यथा संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस गावातील शेतकऱ्यांनी मांडली आहे.
फुणगूस गावातील शेतकरी चंद्रकांत तानाजी घडशी म्हणाले, ‘शेती हीच उपजीविकेचा एकमेव आधार असलेले आमचे कुटुंब आज अत्यंत कठीण परिस्थितीत सापडले आहे. घडशी कुटुंबातील सात सदस्यांचे पोट या भातशेतीवरच अवलंबून आहे. पीक उत्तमपणे वाढून कापणीसाठी सज्ज होते; पण अनपेक्षित पावसाच्या तडाख्याने काही तासांतच सर्व काही संपवलं. भातशेतीचं पूर्ण नुकसान झाल्याने घरात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. आमचं रेशन कार्ड गरीब रेषेच्यावर असल्याने आम्हाला शासनाकडून धान्य मिळत नाही. शेतीचे सर्व काही आहे आणि आता तेच नाहीसं झालं. घरातले सातजण काय खाणार, कसं जगणार हा प्रश्न आहे, असे घडशी यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 AM 03/Nov/2025












