अल्पवयीन मुलाशी असभ्य वर्तन; एकावर गुन्हा दाखल

खेड : जिल्ह्यातील एका गावातील ११ वर्षीय बालकाशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी रवी नरसिंहनारायण सिंग (३५, रा. बिहार) याच्यावर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही घटना २९ ऑक्टोबरला घडल्याचे पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

पीडित मुलगा घराबाहेर खेळण्यासाठी गेला असता संशयिताने त्याला बोलावून त्याच्याशी असभ्य वर्तन केले. ही बाब त्यांनी घरच्यांच्या कानांवर घातल्यानंतर त्यांनी पोलिस ठाणे गाठत तक्रार नोंदवली. अधिक तपास पोलिस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक जयंत गायकवाड करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:49 AM 04/Nov/2025