दापोली : दापोली आगारातून सायंकाळी साडेतीनच्या सुमारास सुटणारी दापोली-पांगारी ही एसटी बस पांगारीहून दापोलीकडे परतत असताना हा अपघात झाला. पांगारी नवाशे परिसरातील फार्महाऊसजवळ समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला बाजू देताना रस्त्याची साईडपट्टी खचल्याने बस एका बाजुला कलंडली.
सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. बसमध्ये चालक सांगे व वाहक या दोघांसह एकूण तीन प्रवासी होते. त्यांना किरकोळ दुखापत झाली असून, सर्व प्रवासी सुखरूप आहेत. अपघातानंतर सामाजिक कार्यकर्ते इलियाज बर्डे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने तत्काळ घटनास्थळी धाव घेत सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. पांगारी ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली. सदर अपघाताची नोंद स्थानिक पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 PM 04/Nov/2025














