मंडणगड : मंडणगड तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून रानडुकरांच्या हल्ल्यामुळे, उपद्रवामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर वनविभाग, मंडणगड यांच्या वतीने प्रभावित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येत असून, गेल्या तीन आर्थिक वर्षात ३० लाखांहून अधिक रक्कम भरपाई स्वरूपात वाटप करण्यात आल्याची माहिती वनविभागातून मिळाली आहे.
तालुक्यातील डोंगराळ आणि बंगलालगतच्या गावभागात रानडुकरांचे प्रमाण अधिक असल्याने शेतकऱ्यांच्या भातशेतीचे वारंवार नुकसान होत आहे. याबाबत शेतकऱ्यांकडून आलेल्या अर्जानुसार, वनविभागाने पंचनामे करून नुकसानभरपाई मंजूर केली, दरम्यान, शेतकऱ्यांनी वनविभागाकडून रानडुकरांच्या नियंत्रणासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
रानडुकरांच्या हल्ल्यामुळे फक्त भातशेतीच नव्हे, तर भाजीपाला आणि फळझाडांचेही नुकसान होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. विभागीय वनाधिकारी रत्नागिरी चिपळूण गिरिजा देसाई, सहायक वनसंरक्षक रत्नागिरी चिपळूण प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वनाधिकारी दापोली पी. जी. पाटील, परिमंडळ वनाधिकारी मंडणगड तौफिक मुल्ला, वनरक्षक ओंकार तळेकर, संतोष गारुळे यावर्षीचे पंचनामे करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:27 PM 04/Nov/2025














