Chiplun : बहादूरशेख नाका येथे चालकाला मारहाण करून मोबाईल चोरला

चिपळूण : बहादूरशेख नाका येथे एका चालकाला मारहाण करून पंचवीस हजारांचा मोबाईल हिसकावल्याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. चिपळूण पोलिस ठाण्यात त्या तिघांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिपळूण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा महादेव राठोड (वय ३३, रा. सिंदगी तांडा, जि. विजापूर) हा चालक आहे. तो बहादूरशेख नाका येथील एका हॉटेलमध्ये त्याच्या मित्रासह बोलत उभा होता. यावेळी संशयित साहिल संतोष साळवी (२२, रा. कोड्ये, चंदनवाडी, ता. चिपळूण), आकाश राजेश पवार (२२, रा. मिरजोळी, बौद्धवाडी, चिपळूण), प्रवीण प्रमोद पवार (२२, रा. मिरजोळी, पवारवाडी, चिपळूण) हे मोटार घेऊन घटनास्थळी आले. तिघांनी कृष्णा राठोड याला हाताच्या थापटाने मारहाण केली तसेच त्याला ठार मारण्याची धमकी दिली. त्याच्याकडे फोन पे चा पासवर्ड विचारला आणि त्याच्या हातात असलेला निळ्या रंगाचा मोबाईल घेऊन पळून गेले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 AM 05/Nov/2025