मंडणगड : मंडणगड शहराचे मूलभूत प्रश्न व शहरातील पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी काम करीत असून ही प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी नागरिकांनी आमदारांच्या सोबतीने शहराच्या प्रश्नावर काम करणारा शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून दिल्यास ही प्रक्रिया अधिक गतिमान होईल, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केले.
साई नगर या प्रभागात नव्याने उभ्या करण्यात आलेल्या शहरातील पहिल्या नानी पार्कचे मंत्री कदम यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, मंडणगड हे लहान शहर असले तरी त्यांचे वेगळे महत्त्व आहे. बदलत्या काळातील नागरी सुविधांचा मंडणगड शहरात विकास करणे हे महत्त्वाचे आहे. शहरासह तालुक्यातील पहिला नगरसेवकांच्या मागणीनुसार उभा करण्यात आला असून त्याने शहराचे वैभवात मोठी भर टाकली आहे. केवळ घोषणा करुन भूमीपजनाची औपचारिकता न करता केलेल्या कामाची पूर्तताही केली जाते याचे हे उत्तम उदाहरण आहे. आगामी काळात खेड व दापोली शहराचा धर्तीवरच मंडणगड शहराचा पाणी प्रश्न ही सोडवीला जाईल. नळपाणी योजनेच्या अंमलबजावणीत येणाऱ्या जागेसह सर्व समस्या सोडवल्या असून राज्याचे उपमुख्यमंत्री व नगर विकास मंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंडणगड शहराच्या विकासाकरिता शिवसेना पक्ष म्हणून वचनबद्ध आहे.
प्रास्ताविक नगरसेवक योगेश जाधव, तर सूत्रसंचालन विरोधीपक्ष गटनेता विनोद जाधव व चेतन सातोपे यांनी केले. कार्यक्रमास माजी सभापती अमिता शिंदे, माजी जि. प. सदस्या अस्मिता केंद्रे, नगरसेवक योगेश जाधव, गटनेता विनोद जाधव, नगरसेवक आदेश मर्चडे, नगरेसविका वैशाली रेगे, सेजल गोवळे, नम्रता पिंपळे, तहसीलदार अक्षय ढाकणे, मुख्याधिकारी महादेव रोडगे, सार्वजनीक बांधकाम उपअभियंता प्रमोद कदम, पोलिस निरीक्षक नितीन गवारे, संतोष मांढरे, अर्जुन भोसले, अनिल कलमकर, नीलेश गोवळे, इरफान बुरोंडकर, चेतन सातोपे, संदेश चिले, संजय शेडगे, हरेष मर्चेंडे आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 AM 05/Nov/2025














