रत्नागिरी : शहरानजिकच्या कारवांचीवाडी येथील पोदार प्रेप येथील शिक्षकांनी शहरातील विविध भागात मुलांना शरिराची काळजी घेणे तसेच मुलांना पळवून नेणे याविषयी जनजागृती करण्यासाठी ‘नुक्कड’ नाटक करून व त्याद्वारे पालकांना शिक्षण देऊन सामाजिक अभियानाची सुरुवात केली. लहान मुलांवर होणारे लैंगिक अत्याचार आणि शोषण रोखणे हा ‘गुड टच-बॅड टच’ या जनजागृती मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
शिक्षक जनजागृती मोहिमेंतर्गत शहरातील विविध भागामध्ये जाऊन गुड टच बॅड टच व विद्यार्थी अपहरण सुरक्षेविषयी जनजागृती करत आहेत. पोदार प्रेपच्या शिक्षकांना प्रेसिडेंट डॉ. स्वाती पोपट-वत्स मार्गदर्शन करतात. त्याचा शहरातील इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना व्हावा याकरिता पोदार शाळेने ही मोहीम हाती घेतली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 AM 05/Nov/2025














