खेड : कार्तिकी एकादशीसाठी येथील एसटी प्रशासनाने जादा बसफेऱ्या चालवण्याचे नियोजन केले. त्यानुसार ३४ बसफेऱ्या आरक्षित केल्या होत्या. २८ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत धावलेल्या बसफेऱ्यांमधून १ हजार ४२७ भाविकांनी पंढरपूर गाठत विठुरायाचे दर्शन घेतले. यातून येथील आगाराला ५ लाख १ हजार ७९९ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले.
कार्तिकी एकादशीसाठी तालुक्यातून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची संख्या सर्वाधिक असते. यासाठी एसटी प्रशासनाने ग्रामीण भागातील बसफेऱ्यांना ‘ब्रेक’ लावत पंढरपूरला ३४ बसफेऱ्या सोडल्या. या बसफेऱ्यांमधून १४२७ वारकऱ्यांनी प्रवास केला. यामध्ये ५७८ पुरुष व ६०९ स्त्रियांचा समावेश होता. ११० नागरिकांनी अमृत योजनेचा लाभ घेतला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 AM 07/Nov/2025














