रत्नागिरी : भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी पदाचा राजिनामा दिल्यामुळे, लेकीच्या भविष्यातील वाटचालीसाठी वडिलांनी राजिनामा दिला याचे आपल्याला दुःख आहे. आपण उबाठामधून इच्छुक असल्याने, पक्षाशी प्रतारणा होऊ नये म्हणून त्यांनी ही भूमिका घेतली असावी, असे मत शिवानी सावंत-माने यांनी व्यक्त केली.
पत्रकारांशी बोलताना त्यांनी म्हटले की, आपले आजोबा माजी आमदार स्व. आप्पा साळवी, माझे सासरे बाळ माने यांनी लोकप्रतिनिधी म्हणून मोठ्या प्रमाणात सामाजिक काम केलेले आहे. माझे वडील भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांना आपण सामाजिक काम करताना लहानपणापासून पाहत आलो आहे. सामाजिक काम करताना आपल्याला सावंत व माने कुटुंबाने नेहमीच पाठिंबा दिला आहे.
आगामी निवडणुकीत आपण नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचे उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातले आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी असल्यामुळेच माझ्या वडिलांनी माझ्यासाठी राजिनामा दिल्याचे वृत्त आपले वाचले व पाहिले आहे. पक्षाच्या कामाशी प्रतारणा होऊ नये, पक्षाशी प्रामाणिक रहाता यावे यासाठीच त्यांनी हा निर्णय घेतला असावा. मात्र त्यांच्या या निर्णयाचे मुलगी म्हणून मला दुःख झाले असल्याचे शिवानी सावंत माने यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:22 07-11-2025












