व्यवहारात वापरली तरच मराठी टिकेल : डॉ. तारा भवाळकर

पुणे : ‘मराठीला अभिजात दर्जा देण्याच्या निर्णयाचे समाधान आहे, मात्र मराठी भाषा मराठी माणसांनीच व्यवहारात आणली नाही तसेच वापरली नाही तर ती टिकणार नाही. याचे कारण भाषा ही माणसांसारखीच सजीव संस्था असते,’ असे प्रतिपादन ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी बुधवारी केले.

संमेलनाध्यक्षपदी झाल्याबद्दल डॉ. भवाळकर यांचा महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे’ (मसाप), ‘अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, मुंबई’ आणि ‘सरहद, पुणे’ यांच्यातर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. या वेळी महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. उषा तांबे, कार्यवाह उज्ज्वला मेहेंदळे, मसापचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, ‘सरहद’चे संजय नहार उपस्थित होते.

डॉ. भवाळकर म्हणाल्या की, “आपली मुले मराठीत व्यवस्थित बोलत आहेत का, त्यांच्यासाठी मराठी शाळा आहेत का, त्या शाळांना अनुदान मिळते का, तेथील शिक्षकांच्या नेमणुका होत आहेत का, याकडेही पाहायला हवे. संमेलनाध्यक्षपद हा माझ्यासाठी सुखद धक्का आहे. संमेलनाध्यक्षांची निवड करताना महिला किंवा पुरुष असा निकष नसावा. तो व्यक्ती त्या पदासाठी पात्र आहे का इतकेच पाहिले जावे. अर्थात महिला म्हणून कोणाकडे दुर्लक्षही केले जाऊ नये. पुण्याशी माझे लौकिक आणि अलौकिक अशा दोन्ही अर्थानी आणि निरनिराळ्या अंगांनी नाते आहे.

मला लोकसाहित्याच्या आवरणात रसिकांनी गुरफटवले आहे. अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. डॉ. कसबे म्हणाले, “डॉ. तारा भवाळकर यांचे लेखन वाचकांच्या जाणिवा विस्तृत करणारे आहे. मला लोकसाहित्याच्या आवरणात रसिकांनी गुरफटवले आहे,’ अशी भावनाही त्यांनी व्यक्त केला डॉ. कसबे म्हणाले, “डॉ. तारा भवाळकर यांचे लेखन वाचकांच्या जाणिवा विस्तृत करणारे आहे. गुणवत्तेच्या आधारावर त्या संमेलनाध्यक्ष म्हणून निवडल्या गेल्याचा विशेष आनंद आहे.”

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:36 PM 24/Oct/2024